Assembley seat allocation: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची महायुती तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (पवार गट) यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिलेल्या भाजपला अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे महायुतीला लोकसभेत बॅकफूटवर जावे लागले. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे. काय म्हणालेयत मुख्यमंत्री? जाणून घेऊया.
स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागावाटपाचे सूत्र असल्याचं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय.. लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त त्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचं सूत्र असेल असं शिंदे अनौपचारिक संवादात म्हणालेत. तसेच जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागावाटपाचा निकष असणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
पुढील 8-10 दिवसात जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.तसेच नोव्हेंबरमध्ये विधानसभा होणार असल्याचे संकेतीही त्यांनी पुन्हा दिले असून दोन टप्प्यात मतदान होणार असल्याचं शिंदे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणालेत.