नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशा शब्दांत संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी संघाचा कल कोणाकडे आहे, याचे संकेत दिलेत.
फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवणही त्यांनी सांगितली. तसंच काही दिवसांच्या प्रचारामुळे २५ वर्षांची युती तुटू नये, अशी आपली अपेक्षा असल्याचंही वैद्य म्हणाले.
दरम्यान, नितीन गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावं, असं वक्तव्य आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केलं होतं. त्यानंतर, विदर्भातले ४० हून अधिक आमदार गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांनी गडकरींना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता विदर्भातले आमदार सरसावले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री होण्याची मागणी केल्यानंतर विदर्भातल्या आमदारांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला.
मी दिल्लीमध्ये खूश आहे, पण पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतील तो मान्य असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच करून आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहे असे स्पष्ट संकेत दिले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू टाकून आपल्या मुख्यमंत्रीपदाची दावेदारी स्पष्ट केली आहे. शिवसेनेने पाठिंबा दिला तर आनंद होईल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर दिल्लीतून तंबी दिली गेली. त्यानंतर सूर बदलला गेला. यापूर्वी आपण दिल्लीत आनंदी आहोत. महाराष्ट्रात येण्याची शक्यता नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.