मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.

Updated: Oct 24, 2014, 11:10 AM IST
मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त! title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.

यात अपक्षांचा १६८३ उमेदवारांसह पहिला क्रमांक आहे तर बसप २७३ आणि मनसे २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

आघाडीच्या माध्यमातून राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राष्ट्रवादीच्या १४८ तर काँग्रेस १४२, शिवसेना ११६ आणि भाजपाच्या ४५ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था यात सर्वांत बिकट आहे. या पक्षाच्या तब्बल २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे़ तसेच या निवडणुकीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे दिसून आले, निवडणुकीच्या रिंगणातील १७९८ पैकी १६८३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, तर अवघे ७ अपक्ष उमेदवार विजयी झाले. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची मतदारांनी दारुण स्थिती करून टाकली.

 

विजय

जप्त

एकूण

भाजप

१२२

४५

२६१

शिवसेना

६२

११६

२८३

काँग्रेस

४२

१४२

२८७

राष्ट्रवादी

४१

१४८

२७८

मनसे

०१

२०३

२१९

बसपा

००

२७३

२८१

अपक्ष

०७

१६८३

१७०८

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.