गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे

गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे

गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी आणि उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य समिकरणांचे संकेत दिले आहेत. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असाही ठाकरी शैलीत राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फटकेबाजी केली. 

Oct 8, 2014, 08:18 PM IST
चीनी सीमेत घुसत होते, मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते

चीनी सीमेत घुसत होते, मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत असताना तिकडे चीनी सैन्याकडून सीमेवर घुसखोरी सुरु होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Oct 8, 2014, 08:01 PM IST
हा विदर्भाच्या जनतेचा अपमान -  विलास मुत्तेमवार

हा विदर्भाच्या जनतेचा अपमान - विलास मुत्तेमवार

महाराष्ट्र अखंड राहणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोंडाईचाच्या सभेत म्हटलं, म्हणजेच स्वतंत्र विदर्भ होणार नाही, यामुळे विदर्भाचा अपमान झाला, असं काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी म्हटलंय. 

Oct 8, 2014, 05:44 PM IST
राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शनाचे प्रयत्न

राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शनाचे प्रयत्न

मतदानाती तारीख आता जवळ येत असतांना, अनेक ठिकाणी लोकांना लक्ष्मी दर्शन देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहेत,  विदर्भातील बुलढाण्यातील चिखलीत ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपुरात १ कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून, तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Oct 8, 2014, 05:27 PM IST
वांद्रे पश्चिम मतदार संघात भाजपची लागणार कसोटी

वांद्रे पश्चिम मतदार संघात भाजपची लागणार कसोटी

वांद्रे विधानसभा मतदार संघात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्धीकी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सगळ्या महाराष्ट्रात बहुमताची हाक देणा-या भाजपला मुंबईच्या अध्यक्षांना विजय मिळवून देण्यासाठी चांगली मेहनत करावी लागणार आहे. 

Oct 8, 2014, 01:04 PM IST
काँग्रेसच्या जाहिरातीत ‘शिव’ला शोधणाऱ्यानं ‘शिवसेने’ला शोधलं

काँग्रेसच्या जाहिरातीत ‘शिव’ला शोधणाऱ्यानं ‘शिवसेने’ला शोधलं

सध्या टिव्हीवर सर्वच पक्षांच्या निवडणूक जाहिरातींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातील काँग्रेसची एक नवीन जाहिरात आहे. त्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी ‘शिव’ नावाच्या मेकॅनिकला शोधत असतो. पण तोच अनिकेत विश्वासराव शिवसेनेचा प्रचार करतोय. म्हणजे खरोखरच त्यानं ‘शिव’सेनेला शोधलं म्हणायचं.

Oct 8, 2014, 11:20 AM IST
अबब! ७ पोत्यांमध्ये ५ कोटी, राजकारण्यांनी आणला पैशांचा पूर

अबब! ७ पोत्यांमध्ये ५ कोटी, राजकारण्यांनी आणला पैशांचा पूर

पुणे-सोलापूर महामार्गावरती मौजे पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी इथं अचारसंहिता भरारी पथकानं पाच कोटी रुपये पकडले. एका कारमधून सात पोत्यांमध्ये असलेली पाच कोटींची रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले. 

Oct 8, 2014, 10:39 AM IST
हा तर पोस्टरबॉय! राज ठाकरेंची तावडेंवर टीका

हा तर पोस्टरबॉय! राज ठाकरेंची तावडेंवर टीका

विनोद तावडे हे भाजपचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचं नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप इथल्या सभेत बोलतांना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.

Oct 8, 2014, 07:11 AM IST
मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट

मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट

नमस्कार,  मी बंड्या, अहो आज मी राजकारणाचे विविध रंग बघितले आहेत, क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे, राजकारणातल्या अनेक तज्ञांनी आपल्या शक्यता व्यक्त केल्या आहेत.  या शक्यतांकडे तुम्ही क्रिकेटचं मैदान म्हणून पाहिलं तर तुम्हाला हे चित्र अधिक स्पष्टपणे पाहता येईल, जसं आयपीएलमध्ये कोणत्याही देशाचा खेळाडू कोणत्याही टीमकडून आणि कुणासाठीही खेळतो, कायमच्या टीमच्या मित्रांविरोधातही त्याला फटकेबाजी करावी लागते, तशीच आताची स्थिती आहे.

Oct 8, 2014, 12:17 AM IST
'पवारांना एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे'

'पवारांना एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे'

शरद पवारांना लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे, मी आणि गोपीनाथरावांनी विरोध केला, त्यामुळे शरद पवारांना एनडीएमध्ये घेता आलं नाही, यासाठी माझ्याकडे अनेक साक्षी आहेत, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केला आहे.

Oct 7, 2014, 11:20 PM IST
विदर्भावर परस्परविरोधी भूमिका का? - राज ठाकरेंचा सवाल

विदर्भावर परस्परविरोधी भूमिका का? - राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कांदिवलीत आज मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी आज सकाळी सभेत महाराष्ट्र अखंड ठेवण्याबद्दल बोलले आणि त्यांचेच नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचं सांगितलं, यांचीच विरोधी भूमिका? , असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Oct 7, 2014, 10:01 PM IST
राज ठाकरेंचं रामदास आठवलेंना उत्तर

राज ठाकरेंचं रामदास आठवलेंना उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा आज आरपीआय नेते रामदास आठवले यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी परभणीच्या सभेत रामदास आठवलेंची नक्कल केली होती, त्या नक्कलला लोणावळ्यात रामदास आठवलेंनी शेरेबाजी करून उत्तर दिलं होतं.

Oct 7, 2014, 09:53 PM IST
राज ठाकरेंना प्रकाश जावडेकरांचा सणसणीत टोला

राज ठाकरेंना प्रकाश जावडेकरांचा सणसणीत टोला

पंतप्रधान मोदी हे इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत, असा नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मोदी सकाळी लवकर उठतात, आणि अकरा वाजता सभा घेतात असं सांगून राज ठाकरे यांच्यावर  तोफ डागली आहे.

Oct 7, 2014, 08:15 PM IST
नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...

नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सायंकाळी 'आरएसएस'च्या गडावर म्हणजेच नागपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी, त्यांनी नागपूरचे खासदार देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी 'खडसे' नावाचा विसर त्यांना पडला.

Oct 7, 2014, 06:42 PM IST
भाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

Oct 7, 2014, 05:28 PM IST
'छत्रपतींचा आशीर्वाद मागणारे सभेत एक पुतळाही ठेवत नाहीत'

'छत्रपतींचा आशीर्वाद मागणारे सभेत एक पुतळाही ठेवत नाहीत'

शिवरायांचा आशीर्वाद मागणारे सभेत छत्रपतींचा पुतळाही ठेवत नाही, असं म्हणत बीडच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी उडवली मोदींची खिल्ली उडवलीय.

Oct 7, 2014, 04:08 PM IST
शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो

शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बीड इथं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. अर्थातच, उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी इथं पोस्टरबाजीही करण्यात आली होती... यावेळी, शिवसेनेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचाही फोटो दिसत होता.

Oct 7, 2014, 03:46 PM IST
मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी

मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. 

Oct 7, 2014, 11:58 AM IST
सीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!

सीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.

Oct 7, 2014, 07:25 AM IST
गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

Oct 7, 2014, 07:07 AM IST