रामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार

रामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार

 रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत. 

Oct 2, 2014, 01:03 PM IST
गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करू - गडकरी

गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करू - गडकरी

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचं ते म्हणाले. 

Oct 2, 2014, 12:10 AM IST
विकासाची ब्ल्यू प्रिंटने राज ठाकरे चमत्कार करतील?

विकासाची ब्ल्यू प्रिंटने राज ठाकरे चमत्कार करतील?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय... ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्नं ते मतदारांपुढं मांडले आहे. 

Oct 1, 2014, 09:39 PM IST
जयंत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले

जयंत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले

इस्लामपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. 

Oct 1, 2014, 09:34 PM IST
शिवसैनिकांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसैनिकांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं होतं तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर 'मातोश्री'चा 'रिमोट कंट्रोल' चालायचा... पण आता 'मातोश्री'लाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायत... 

Oct 1, 2014, 09:16 PM IST
दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?

दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय. 

Oct 1, 2014, 09:15 PM IST
'ब्रिजभूषण पूलकरी’ नितीन गडकरी भाजपचे दावेदार

'ब्रिजभूषण पूलकरी’ नितीन गडकरी भाजपचे दावेदार

नितीन गडकरी आता दिल्लीच्या राजकारणात सेट झालेत... पण महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तर ते मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील, अशी खात्री भाजपवाल्यांना आहे... 

Oct 1, 2014, 09:05 PM IST
राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे अघोषीत उमेदवार अजित पवार

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे अघोषीत उमेदवार अजित पवार

15 वर्षं आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आहे. पण राष्ट्रवादीच्या वाट्याला कायम उपमुख्यमंत्रीपदच आलंय... यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार होईल का...? 

Oct 1, 2014, 08:43 PM IST
मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत

मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

Oct 1, 2014, 08:34 PM IST
नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य

नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य

नाशिक शहरातल्या 4 मतदारसंघात आज उमेदवारीच्या माघारीवरून चांगलंच नाट्य रंगलं. तब्बल 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं अनेकांनी सुस्कारा टाकला तर काही ठिकाणी माघार न घेतल्यानं ताणतणाव होता. मतविभागणीनेच विजय सुकर होणार असल्यानं प्रचारापेक्षा आज सर्वांचंच लक्ष्य राजकीय घडामोडींकडे लागलं होतं.

Oct 1, 2014, 08:21 PM IST
मोदींची पहिली सभा कोल्हापूरलाच का?

मोदींची पहिली सभा कोल्हापूरलाच का?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिला जाहीर सभा कोल्हापूरात होणार आहे. भाजपनं मोदींच्या पहिल्या सभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची निवड करण्यामागची अनेक कारणं असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शक्तीस्तळावर आघात करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

Oct 1, 2014, 08:02 PM IST
पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त

पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त

 यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... 15 वर्षांचं आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि काँग्रेसमधील विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... यंदा जाहिरातीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केलेला दिसतो आहे. काँग्रेसला जे काही यश मिळेल ते पृथ्वीबाबांच्या इमेजमुळेच.... 

Oct 1, 2014, 07:36 PM IST
स्वतंत्र विदर्भाला मनसेचा विरोधच – राज ठाकरे

स्वतंत्र विदर्भाला मनसेचा विरोधच – राज ठाकरे

 वेगळ्या विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करू देणार नाही, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केलीय. 

Oct 1, 2014, 06:25 PM IST
पेड न्यूज प्रकरण अशोक चव्हाणांना कोर्टाचा दणका

पेड न्यूज प्रकरण अशोक चव्हाणांना कोर्टाचा दणका

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असं चित्र आहे. 

Oct 1, 2014, 06:02 PM IST
सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश

सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे. 

Oct 1, 2014, 05:07 PM IST
आमीर खान मतदान करणार नाही

आमीर खान मतदान करणार नाही

अभिनेता आमीर खान यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. विधानसभेचं मतदान 15 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी आमीर खान मुंबईत नसून अमेरिकेत असणार आहे.

Oct 1, 2014, 04:56 PM IST
शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला

शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला

शिवसेनेला मुंबईत एक धक्का बसला आहे, राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. अंधेरी पश्चिमच्या वर्सोवा मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी निवडणूक आयोगाने फेटाळला. 

Oct 1, 2014, 04:28 PM IST
UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!

UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!

इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय. 

Oct 1, 2014, 04:22 PM IST
'मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं नाही'

'मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं नाही'

शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. एनडीएची सत्ता केंद्रात आणण्यासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. यामुळे आम्ही राजीनामा देणार नसल्याचं अनंत गिते यांनी स्पष्ट केलं आहे.

Oct 1, 2014, 01:41 PM IST
'लाट' असेल तर पंतप्रधानांच्या सभांची गरजच काय - उद्धव

'लाट' असेल तर पंतप्रधानांच्या सभांची गरजच काय - उद्धव

'मोदींची लाट असेल तर त्यांच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कशासाठी?' असा सरळ सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी 'विश्वासघातकी' भाजपवर निशाणा साधलाय. यावेळी, यंदा दसऱ्याला शीवतीर्थावर जाणार... पण, मेळावा होणार नाही, असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. 

Oct 1, 2014, 01:36 PM IST