शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बीड इथं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. अर्थातच, उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी इथं पोस्टरबाजीही करण्यात आली होती... यावेळी, शिवसेनेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचाही फोटो दिसत होता.

Updated: Oct 7, 2014, 03:47 PM IST
शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो title=

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बीड इथं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. अर्थातच, उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी इथं पोस्टरबाजीही करण्यात आली होती... यावेळी, शिवसेनेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचाही फोटो दिसत होता.

मुंडे आणि ठाकरे घराण्याचे राजकारणापलिकडचे कौटुंबिक संबंध होते, असं दोन्ही कुटुंबीयांनी याआधीच अनेक वेळा म्हटलं आहे. शिवाय, मुंडे असते तर युती तुटली नसती, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी याआधीही व्यक्त केली होती. तसंच, शिवसेनेनं गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही मुली पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे खाडे यांच्याविरुद्ध अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारही दिलेला नाही. ‘बहिणीविरुद्ध लढणार नाही’ असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. 

मुंडे आणि ठाकरे घराण्याचा हा जिव्हाळा कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.