Pakistan blast: भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बलुचिस्तान प्रांतातील व्केटा रेल्वे स्थानवर शनिवारी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, या घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमी असलेल्या व्यक्तींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्टनुसार, जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता रवाना होणार होती. ज्याचा प्लॅटफॉर्म प्रवाशांनी प्रचंड भरलेला होता. त्याचवेळी हा मोठा बॉम्बस्फोट झाला. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांची धावपळ सुरु झाली.
Scene at #Quetta #Railway station after the huge blast carried out by a suicide bomber of Baloch Liberation Army (BLA). #Balochistan #Hakkal https://t.co/1fDdaXQIWh pic.twitter.com/g8kuEieQS1
— News Vibes of India (@nviTweets) November 9, 2024
या बॉम्बस्फोटाची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या प्रवक्याने पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये सांगितले की, क्वेटा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या हल्ल्याची आम्ही जबाबदारी घेत आहोत. आज सकाळी, जाफर एक्सप्रेसने परतत असताना क्वेटा रेल्वे स्थानकावर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला बीएलएच्या आत्मघाती युनिट मजीद ब्रिगेडने केला होता. यासंदर्भातील संपूर्ण माहिती ही लवकरच प्रसारमाध्यमांना दिली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
पाकिस्तानचे अध्यक्ष सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोट हल्लाचा निषेध केलाआहे. पुढे ते म्हणाले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी निरपराध लोकांना लक्ष्य केले आहे. यासोबतच दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलली जातील असं सय्यद युसूफ म्हणाले.