नितीन गडकरींवर पुण्यात बूट फेकण्याचा प्रयत्न
नितीन गडकरी यांच्यावर पुण्यातील कोथरुड येथील सभेत एका व्यक्तीनं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधीत व्यक्तीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून, ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे.
पाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
निवडणुकीचा मुद्दा अस्मिता...
नमस्कार, तुमचा बंड्या, बंडोजीराव आपल्या भेटीला आलंय, भेटीगाठी सध्या महत्वाच्या आहेत, कारण महाराष्ट्राचं राजकारण खूपचं तापलंय, महाराष्ट्रात सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असले, तरी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या मुद्यावर संयुक्त लढत असल्याचं चित्र आहे. कालपर्यंत टेलव्हिजनवरच्या जाहिराती, सोशल नेटवर्किंगवरचे जोक, थट्टा-मस्करी आता दोन राज्यातील अस्मितेच्या प्रश्नांवर येऊन ठेपलीय.
'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र... गुजरातमध्ये?'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज डोंबिवलीत पार पडली. डोंबिवलीनंतर लगेचच कल्याणमध्येही राज ठाकरेंची सभा होणार आहे.
'गंगाखेड'चा निवडणूक बाजार उधळला, दोन उमेदवारांना अटक
मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करण्याच्या आरोपाखाली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातील दोन उमेदवारांना निवडणूक आयोगानं अटक केल्यानं एकच खळबळ उडाली. पण, अटक केल्यानंतर काही वेळातच या दोघांनाही जामीन मिळालाय.
मोदींना मुंडेंच्या अंत्यदर्शनाला वेळ नव्हता, मात्र...
छगन भुजबळ यांनी मोदींवर तोफ डागली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना छगन भुजबळ म्हणाले, जो नेता गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीला मराठवाड्यात यायला वेळ नाही, त्या नेत्याला महाराष्ट्रात २५ सभा घ्यायला वेळ आहे.
पवार म्हणतात, कोण म्हणतं शिवसेना एकाकी पडलीय?
शिवसेना – भाजपची गेल्या 25 वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेना एकाकी पडलीय? अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळतेय. पण, यावर पवारांनी गुगली टाकलीय. ‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी पडलीय?’ असा प्रश्न पवारांनी उपस्थित केल्यामुळे साहजिकच पवारांच्या डोक्यात काय शिजतंय? असं वळण आता या चर्चेला मिळालंय.
मोदींनी पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला तडा दिला : शरद पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभेच्या निवडणुकीत देशाचा कारभार सोडून राज्यात २२ सभा घेत आहेत, यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला त्यांनी तडा गेलाय, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.
राज्याचं सिंचन वाढवलं, हा घोटाळा नाही : अजित पवार
मी सिंचन घोटाळा केला नाही, विरोधकांनी फक्त आपल्या नावाचं वावटळ उठवलं, बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. राज्याचं उलट सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
भाजप विरोधासाठी राज-उद्धव एकत्र?
भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय.
'महाराष्ट्राला जिंकायला अफजल खानाची फौज आलीय'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टिका केलीय.
मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले.
‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
मी बंडोजीराव म्हणजे बंड्या, आज बंड्याने अनेक मेसेज वाचले, पण एक सवाल मनात आला, राजकारणाचं काय, निवडणुका येतील आणि जातील पण व्हॉटस ऍपवर महाराष्ट्राची मानहानी का? अरे कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र आणि त्यावर व्हॉटस ऍपवर येणारे जोक्स वाचून एकच काय, तर महाराष्ट्राची मानहानी. लक्षात ठेवा या राज्याने अनेकांना मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. व्हॉटस ऍपवरील विनोदापायी बदनामी कशाला?
राज ठाकरेंची तोफ पहिल्यांदा मोदींवर धडाडली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार जाहीर सभेतून हल्लाबोल केला आहे.
तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा - राज ठाकरे
मुंबईकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली, तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहणार, असा इशारा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत दिला आहे.
हे मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात डोकेदुखीचे ठरू शकतात
केंद्रात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला काही महत्वाचे मुद्दे डोकेदुखी ठरू शकतात, किंबहुना भाजप नेत्यांनाही या मुद्यांची कुणकुण कार्यकर्त्यांकडून लागली असावी.
पृथ्वीराज चव्हाणांचे नरेंद्र मोदींवर आसूड
मुंबईचं खच्चीकरण करून अहमदाबादचं महत्व वाढवण्याचं नरेंद्र मोदींनी डोक्यात घेतलंय, अशी सणसणीत टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
नाशिकमधील नरेंद्र मोदींची सभा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये होणारी सभा रद्द कऱण्यात आली आहे, ही सभा आज रात्री साडेआठ वाजता आयोजित करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे ग्राऊंडवर पाणी साचल्याचं कारण सांगितलं जातंय.