हा तर पोस्टरबॉय! राज ठाकरेंची तावडेंवर टीका

विनोद तावडे हे भाजपचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचं नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप इथल्या सभेत बोलतांना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.

Updated: Oct 8, 2014, 07:11 AM IST
हा तर पोस्टरबॉय! राज ठाकरेंची तावडेंवर टीका title=

मुंबई : विनोद तावडे हे भाजपचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचं नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप इथल्या सभेत बोलतांना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.

‘इथं एक येडं उभयं... स्वत:चा मतदारसंघ सोडून आलायं. घर कुठे? उभा रहातोय कुठून... सगळी नौटंकी नुसती... पोस्टरबॉय आहे नुसता...’ अशा शेलक्या शब्दात बोलताना राज म्हणाले, यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांचं ऐकायला कोणी येत नाही म्हणून नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलले ते अगदी खरं होतं. जर गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला एवढ्या सभा घेण्यासाठी येण्याची देखील गरज उरली नसती. मात्र यांच्याकडे गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीत असंही राज यांनी सांगितलं.

भाजपाचे विनोद तावडे विलेपार्ले भागात रहातात आणि विधानसभेसाठी मात्र त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून बोरीवलीची निवड केली. बोरीवलीतून तीनवेळा निवडून आलेले भाजपाचे हेमेंद्र मेहता यांच्यासह मनिषा चौधरी इथून उत्सूक होत्या. मात्र मेहतांना मागठाणेमधून उमेदवारी देत त्यांचा पत्ता कट केला गेला आणि मनिषा चौधरींना देखील दहिसरमध्ये पाठवण्यात आलं. काटेकी टक्कर करुन निवडून यायचं होतं तर तावडेंनी मागठाणे इथून मनसेचे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दंड का थोपटले नाहीत, अशी प्रतिक्रीया भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

शिवाय पार्ल्यातून आपल्याला उभं राहायचं आहे पण तो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, असं सांगून तावडेंनी तिथून काढता पाय घेतला होता. पण युती तुटल्यानंतर पार्ल्याची जागा पराग अळवणीच्या गळ्यात बांधून तावडेंनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून बोरीवली गाठल्याची चर्चा पार्ल्यात देखील रंगलेली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.