प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळं ,भाजीपाला , धान्य येतं आणि ते आपण आवर्जून खातो . उदारणार्थ .उन्हाळ्यात कलिंगड , आंबा , काकडी खातो. प्रत्येक ऋतूमध्ये येणारी फळं ,भाजीपाला , धान्य हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आता थंडीचा ऋतू आल्यावर बाजारात सीताफळे दिसू लागतात. सीताफळ म्हटलं की, लट्ठपणा,खोकला, सर्दी याची भिती सर्वांनाच वाटू लागते. सीताफळ हे फार गोड असतं आणि त्यामुळेचं मधुमेह असलेल्यांना हे फळ खाणं वर्ज असतं, असं म्हटलं जातं. मात्र, सीताफळात आरोग्यासाठी अनेक महत्त्वाचे घटक असतात.
सीताफळात अँटिऑक्सिडंट, व्हिटामिन c यांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपण कोणत्याही अॅलर्जीपासून दूर राहतो. गर्भवती महिलांनी हे फळ विशेष करुन खाल्ले पाहिजे. त्यामुळे गर्भवती महिला आणि गर्भाची वाढ चांगली होते. या फळामध्ये लोह, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम , व्हिटामिन A , कॅल्शियम असल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. सीताफळ हे शरिरासाठी खूप उपयुक्त असते .आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी सोशल मीडिया अकांऊटवर सीताफळाबद्दल माहिती दिली.
1. डायबिटीज असेल तर सीताफळ खाऊ नये?
डायबिटीज असेल तर ग्लायकेमिक इंडेक्स जास्त असलेले पदार्थ टाळावे, पण सीताफळामध्ये ग्लायकेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते, त्यामुळे सीताफळ खाल्ल्यानं डायबिटीज रुग्णाला काही त्रास होत नाही.
2.वाढलेल्या वजनामुळे सीताफळ खात नाहीत?
सीताफळामध्ये B कॉम्प्लेक्स घटक असतो . त्यामुळे शरिरातील गॅस कमी होतो आणि
शरीर सुजल्यासारखे वाटत असेल तर ते कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा : https://zeenews.india.com/marathi/lifestyle/do-not-make-these-5-mistakes...
3. हृदयरोगी असाल तर सीताफळं खाऊ नये?
व्हिटामिन C असलेले पदार्थ हृदयरोगी रुग्णांनी खाल्ले पाहिजे सीताफळामध्ये व्हिटामिन C आणि मॅंगनिज असतं त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालु राहते.
4.PCOD असलेल्यांनी सीताफळं खाणे टाळावे ?
महिलांना कधी थकल्यासारखे वाटू लागते तर थकवा दूर होण्यासाठी सीताफळाचे सेवन करावे. सीताफळांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि ते महिलांच्या आरोग्यासाठी फायदेकारक असते. चिडचिडेपणा होत असेल तर सीताफळ खावं. महिलांची प्रजनन क्षमता सुधरते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही.)