राज ठाकरेंना प्रकाश जावडेकरांचा सणसणीत टोला

पंतप्रधान मोदी हे इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत, असा नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मोदी सकाळी लवकर उठतात, आणि अकरा वाजता सभा घेतात असं सांगून राज ठाकरे यांच्यावर  तोफ डागली आहे.

Updated: Oct 8, 2014, 03:26 PM IST
राज ठाकरेंना प्रकाश जावडेकरांचा सणसणीत टोला title=

मुंबई : पंतप्रधान मोदी हे इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत, असा नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मोदी सकाळी लवकर उठतात, आणि अकरा वाजता सभा घेतात असं सांगून राज ठाकरे यांच्यावर  तोफ डागली आहे.

सीमेवर जवान शहिद होत आहेत, आणि पंतप्रधान हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचार सभा घेत फिरत आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. या टिकेला भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेनेवरही घणाघाती प्रहार
शिवसेनेच ताळतंत्र सुटल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय, तसेच उद्धव आणि राज हे शरद पवारांच्या सुरात सूर मिसळत असल्याची अडचणही यावेळी प्रकाश जावडेकर यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करणारी भाजपा म्हणजे अफजलखानाची फौज असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला उत्तर देताना जावडेकरांनी सेनेला टोला लगावला आहे. 

राज्यात आमचेच सरकार येणार आहे हे दिसत असल्याने पराभवाच्या भीतीने शिवसेनेचे ताळतंत्र सुटल्याने ते अशी टीका करत आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.