'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

वाळू तस्करी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच असल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

Oct 3, 2014, 12:55 PM IST
विनोद तावडे... गृहमंत्रीपदाचे दावेदार?

विनोद तावडे... गृहमंत्रीपदाचे दावेदार?

सध्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे... भाजपच्या वरच्या फळीतील नेतृत्वांपैकी एक... भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक... काही जण त्यांना गृहमंत्रीपदी बसलेलं पाहत आहेत...

Oct 3, 2014, 12:30 PM IST
घुसखोरी हिंदू समाजाला घातक : भागवत

घुसखोरी हिंदू समाजाला घातक : भागवत

  नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी विविधतेला स्वीकार करण्यात मानवतेचा विकास शक्य असल्याचं म्हटलं आहे.  विजयादशमी निमित्त आरएसएसच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी तासभर केलेल्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे स्वयंम सेवकांसमोर ठेवले.  दरवर्षी विजयादशमीला संघ प्रमुख आपल्या स्वयंसेवकांना संबोधित करतात, संघाची नीती आणि विचारांविषयी ते चर्चा करतात. डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये आरएसएसची स्थापना केली होती. 

Oct 3, 2014, 12:12 PM IST
जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष

जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष

महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.

Oct 2, 2014, 11:11 PM IST
एकनाथ शिंदे कामी येणार कुशल संघटन?

एकनाथ शिंदे कामी येणार कुशल संघटन?

जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे इथे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे आणि काँग्रेसनेही इथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Oct 2, 2014, 10:21 PM IST
शुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला?

शुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला?

शिवसेनेने आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे, नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आणि दहिसरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. राऊळ यांच्या मनसे प्रवेशामुळे दहिसर मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसरला मोठे भगदाड पडले आहे. 

Oct 2, 2014, 09:54 PM IST
बारामतीत कार्यकर्त्यांकडे अजित पवारांच्या प्रचाराची धुरा

बारामतीत कार्यकर्त्यांकडे अजित पवारांच्या प्रचाराची धुरा

राज्यात सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सुरू केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार 1991 पासून सातत्याने विजयी होत आले आहेत. या मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे. 

Oct 2, 2014, 08:41 PM IST
फडणवीसांच्या मतदारसंघातही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

फडणवीसांच्या मतदारसंघातही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशा घोषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल केला. दक्षिण-पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार-उमेदवार आण‌ि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‌देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गुंजत आहे. इथे आमदारासाठी नाही, तर भावी मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक होत असल्याची जोरदार चर्चा आहे.यामुळे फडणवीसांच्या विरोधात भक्कम चक्रव्यूह कसा आखता येईल, त्यांना कसं अडचणीत आणता येईल, याची आखणी सुरू आहे.

Oct 2, 2014, 08:26 PM IST
दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध

दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास प्रचारगीत तयार केलंय. या प्रचारगीताचं अनावरण आज शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे आदींच्या उपस्थितीत कोहिनूर हॉटेलमध्ये झालं.

Oct 2, 2014, 07:58 PM IST
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात!

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात!

महाराष्ट्रातला रणसंग्राम रंगतदार अवस्थेत असताना आज राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. राज्यातल्या नववी पास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 

Oct 2, 2014, 07:29 PM IST
कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान

कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान

कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Oct 2, 2014, 07:28 PM IST
अडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं

अडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं

शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही खेद व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून, राज्याराज्यातल्या प्रादेशिक पक्षांना झुकतं माप देण्याची गरज आहे, असा वडीलकीचा सल्ला अडवाणी यांनी दिलाय.

Oct 2, 2014, 06:53 PM IST
शिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान

शिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान

 भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते. 

Oct 2, 2014, 06:28 PM IST
तुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन

तुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन

जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे. सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही. एकंदरीत सुरेश जैन यांच्या नावाचा दबदबा हा फक्त जळगाव शहरात आहे. इतर तालुके अथवा गावात हा दबदबा दिसून येत नाही.

Oct 2, 2014, 04:58 PM IST
पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!

पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!

‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.

Oct 2, 2014, 04:45 PM IST
भाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

भाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. 

Oct 2, 2014, 04:37 PM IST
छगन भुजबळांचा राजकीय प्रवास

छगन भुजबळांचा राजकीय प्रवास

येवला मतदारसंघात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात सरळ लढत होत असून, पवारांनी भुजबळांसमोर तगडे आव्हान उभे केल्याने त्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Oct 2, 2014, 04:33 PM IST
पवारांची खेळी राष्ट्रवादीला तारणार का?

पवारांची खेळी राष्ट्रवादीला तारणार का?

ज्यांच्या डाव्या हाताला कळत नाही की उजवा हात काय करते आणि सहज गेम होतो, असं राजकीय वि आहे आणि ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतो, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

Oct 2, 2014, 02:05 PM IST
'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?

'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत. 

Oct 2, 2014, 02:02 PM IST
'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?

'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?

 राजू शेट्टी यांचं  नाव एव्हाना महाराष्ट्राच्या खेड्यानपाड्यांत पोहचलंय. कांद्याला योग्य भाव मिळवून देणं असो किंवा ऊसतोडणी कामगारांचा लढा... राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाचा पक्ष हक्कानं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलेला महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय... त्यामुळेच हा महाराष्ट्रही लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा राहिलात. आता, विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी नावाचा दबदबा दिसून येतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Oct 2, 2014, 01:05 PM IST