मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा आज आरपीआय नेते रामदास आठवले यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी परभणीच्या सभेत रामदास आठवलेंची नक्कल केली होती, त्या नक्कलला लोणावळ्यात रामदास आठवलेंनी शेरेबाजी करून उत्तर दिलं होतं.
मेरी 'बेडुकउडी' नहीं 'ढाण्यावाघ' की उडी हैं, मत करो मेरी नक्कल मी करून टाकेल तुमचं टक्कलं, अशी शेरेबाजी रामदास आठवले यांनी करून राज ठाकरेंना उत्तर दिलं होतं, तसेच तुम्ही नाशिकच्या कोळसा केल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
रामदास आठवलेंना उत्तर
रामदास आठवले यांना राज यांनी आज कांदिवलीच्या सभेत उत्तर दिलं आहे, मला रामदास आठवले म्हणतात, करून टाकेन तुमचं टक्कल, यावर राज म्हणाले आहेत, हा काय करणार माझं टक्कल, बे अक्कल, अशी जुगलबंदी राज ठाकरे आणि रामदास आठवले यांच्यात रंगली आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.