शरद पवार, उद्धव आणि राज हे गल्लीतले नेते
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लीपुरता मर्यादित नेते असल्याची झणझणीत टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत, त्याचेही त्यांनी समर्थन केले आहे.
खान्देशात १ कोटी रूपयांची रोकड पकडली
महाराष्ट्रात रोकड जप्तीचं सत्र सुरूच आहे, अमळनेर - चोपडा दरम्यान नाकाबंदीत भरारी पथकाला तपासणीत १ कोटी रूपयांची रोकड मिळाली आहे, ही रोकड टाटा सुमोमध्ये आढळून आली आहे.
जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९६ जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.
आता कुणीही विचारणार नाही, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?',
भाजपने विधानसभेसाठी केलेली जाहिरात 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?', ही जाहिरात प्रचंड चर्चेत आली, पण ती जाहिरात आता भाजप गुंडाळून ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
बाळासाहेबांना हयातीत कुटुंब एकसंध ठेवता आलं नाही : स्वराज
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीका करतांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला असला, भाजपला अफझलखानाची फौज म्हटल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी उद्धव ठाकरे यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
आता, भाजपनं केली शिवसेनेची सफाई!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर मैदान स्वच्छ करण्याचं आवाहन करतायत आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय... अन्य पक्षांच्या सभांमध्ये मात्र याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसत नाहीय. (केवळ दिखावा करण्यासाठी असेल तर तो भाग निराळा...)
पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी
बारामती येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पाहू या काय म्हणाले पवार
शिवरायांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पुण्यातल्या भोसरीत सभा पार पडली...
महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या : राजनाथ सिंह
केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह हे महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यातही बहुमत असणे गरजेचे आहे, म्हणून महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या, कारण भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
'कामांचा हिशोब मागितला तर एव्हढं हैराण व्हायला काय झालं?'
राज्याच्या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही उडी घेतलीय. कोल्हापूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासोबतच सोनिया गांधीही उपस्थित होत्या.
मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ढोंगीपणा आता उघड झालाय.
सोशल मीडियाच्या वापरावर निवडणूक आयोगाचं लक्ष
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राजकीय पक्षांप्रमाणे आता निवडणूक आयोगालाही या माध्यमाचं महत्त्व कळलंय.
दुसऱ्या जनमत चाचणीत कोणाला किती मिळालाय कौल?
राज्यात सध्या वेगवेगळे निवडणूक सर्व्हे येत आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर सट्टे बाजाराचेही महाराष्ट्रातील निवडणुकीकडे लक्ष आहे. सी-वोटरने, न्यूज एक्सच्या दुसऱ्या जनमत चाचणीनुसार पुन्हा एकदा भाजपला कौल मिळाला आहे. युती आणि आघाडीचा सर्वाधिक फायदा हा मनसेला होईल असे दिसत आहे.
‘मातोश्री’ची मर्यादा ओलांडू नका - सुषमा स्वराज
सातत्यानं भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी टीका केलीय. आमच्या प्रचार यंत्रणेला ‘अफजल खाना’ची फौज असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ भवनाची मर्यादा ओलांडू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
मोदींकडून सरकारी यंत्रणेचा वापर, निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष - राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर भाजप या राजकीय पक्षासाठी होत आहे, असा आक्षेप घेत निवडणूक आयोग का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर सभेत विचारला.
शिवसेनेला अमित शहांनी डिवचलं, वाघ नव्हे उंदीर!
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली. शिवसेनेवर टीका करणार नाही, असं भाजपकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र, भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका करीत आहेत. त्याचाच प्रत्यय सिल्लोडमधील अमित शहांच्या सभेत आलाय.
त्या साडेचार लाखांवर तटकरेंचं स्पष्टीकरण
गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
अफजलखान कोण?, मोदी की अमित शहा?, सुप्रिया सुळेंचा सवाल
शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना नेमकं अफजलशहा कुणाला म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी यांना की, अमित शहांना, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
स्टाफ सिलेक्शनमध्ये मराठींना बाद करण्याचा डाव
स्टाफ सिलेक्शन परिक्षांचा आणखी एक गोंधळ समोर येतोय, यामागे मराठी मुलांना स्पर्धेतून बाजूला करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचं म्हटलं जातंय. कारण विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचं परीक्षा केंद्र निवडल्यानंतरही विद्यार्थ्यांना दूरची केंद्र दिली जात आहेत.
राज यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे पुन्हा संकेत
शहरात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे संकेत दिले आहेत. वेळ आली तर मी सरकारचा कारभार मागे उभा राहून हाकणार नाही, तर आत येऊन हाकेन, असं त्यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.