राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शनाचे प्रयत्न

मतदानाती तारीख आता जवळ येत असतांना, अनेक ठिकाणी लोकांना लक्ष्मी दर्शन देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहेत,  विदर्भातील बुलढाण्यातील चिखलीत ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपुरात १ कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून, तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Updated: Oct 8, 2014, 06:02 PM IST
राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शनाचे प्रयत्न title=

बुलढाणा : मतदानाती तारीख आता जवळ येत असतांना, अनेक ठिकाणी लोकांना लक्ष्मी दर्शन देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहेत,  विदर्भातील बुलढाण्यातील चिखलीत ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपुरात १ कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून, तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

परभणीतही संशायस्पद ४ लाख ४५ हजार जप्त
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या स्कार्पिओ गाडीत सापडलेल्या एका बॅगेत ४ लाख ४५ हजार जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांना ड्रायव्हरने विचारले असता, यात अजित पवार आणि त्यांच्या पीएंचे कपडे असल्याचं त्यानं सांगितलंय, मात्र हे अजित पवारांचेच कपडे आहेत का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

जप्त करण्यात आलेल्या बॅगेत ४ लाख ४५ हजार आणि प्रवासातले कपडे आढळून आले आहेत.अजून याबाबतील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. निवडणूक आयोगाच्या पथकाकडे ही गाडी सोपवण्यात येणार आहे. तसेच हे सामान लातूरला नेण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.