दोंडाईचा, धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेकडून सातत्यानं भाजपवर वेगळा विदर्भ आणि वेगळी मुंबई करणार असल्याचा आरोप होतोय. या आरोपावरच मोदींनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून मुंबईशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण असल्याचं मोदी म्हणाले.
छोट्या राज्यांविषयी भाजपची नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका राहिलीय. भाजपच्या विदर्भातील नेत्यांनी सातत्यानं वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली होती. आता मात्र मोदींनी अखंड महाराष्ट्राची घोषणा केल्यानं भाजपचे विदर्भवादी नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता त्यांची भूमिका काय असेल हे पाहाणं औत्युक्याचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं मोदींची पहिली सभा झालीय. मोदींनी बोलतांना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर जोरदार टीका केलीय. या सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं आणि सरकारचा नुकसान केल्याचा आरोप केलाय. .
पाहा मोदींच्या भाषणातील मुद्दे -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.