गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे

गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी आणि उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य समिकरणांचे संकेत दिले आहेत. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असाही ठाकरी शैलीत राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फटकेबाजी केली. 

Updated: Oct 8, 2014, 08:18 PM IST
गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे title=

मुंबई : गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी आणि उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य समिकरणांचे संकेत दिले आहेत. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असाही ठाकरी शैलीत राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फटकेबाजी केली. 

शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता, मी सत्तेसाठी लाचार नाही, पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, विकासासाठी एकत्र यायचं असेल तर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ.  कोणाचाही इगो, भांडण यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असंही ते म्हणाले. तसेच तुमच्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची जास्त चिंता आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजप आणि शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली होती. अनेक शहरांतील महापालिकांतील गणित पाहता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता बोलली जात होती. त्यासाठी शिवसेना आणि मनसेतील दुसऱ्या फळीतील नेते एकमेकांना भेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. 

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना एकमेकांवर टीका करणे टाळत आहे. त्यामुळे नव्या समिकरणांची नांदी आहे का असा कयास लावला जात होता. सध्या राज व उद्धव यांच्या भाषणातील सूरही एकच 'मोदीविरोधी' दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक तर्क लढवले जात असून राज यांच्या या विधानाने अनेक चर्चांना उधाण आले. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.