मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट

Updated: Oct 8, 2014, 12:17 AM IST
मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट title=

नमस्कार, 
मी बंड्या, अहो आज मी राजकारणाचे विविध रंग बघितले आहेत, क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे, राजकारणातल्या अनेक तज्ञांनी आपल्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. 

या शक्यतांकडे तुम्ही क्रिकेटचं मैदान म्हणून पाहिलं तर तुम्हाला हे चित्र अधिक स्पष्टपणे पाहता येईल, जसं आयपीएलमध्ये कोणत्याही देशाचा खेळाडू कोणत्याही टीमकडून आणि कुणासाठीही खेळतो, कायमच्या टीमच्या मित्रांविरोधातही त्याला फटकेबाजी करावी लागते, तशीच आताची स्थिती आहे.

हा महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आलेला इंडियन पॉलिटीकल लीगचा एक रंग आहे, या आयपीएलमध्ये सर्व टीमचे कोच आहेत, किंवा ज्यांना हा कोच मदत करेल आणि मैदान मारता येईल अशी अपेक्षा सर्वच खेळाडूंना आहे.

ज्यांना देशाच्या आणि क्रिकेटच्या राजकारणाचा अनुभव आहे, असे धुरंधर राजकारणी पवार साहेब हे या सर्व टीमचे कोच आहेत असं समजा, आणि ठाकरे बंधूना त्यांनी सलामीवीर म्हणून पाठवलंय, जोरदार फटकेबाजी करण्याचा त्यांचा इशारा आहे.

आयपीएल आहे ही आपल्याला जिंकायचीय, नंतर काय आपल्याला खेळाचंच आहे, टीम इंडियात आपल्या कायमच्या टीममध्ये त्याआधी जरा आयपीएलमध्ये एकमेकांविरोधात उभे तर ठाका, असा इशारा पवारांनी दिलाय़, समजदार को इशारा काफी असे दोन्ही ठाकरे बंधू, अमित शहांच्या प्रत्येक बॉलला चौकार आणि षटकार लगाऊ लागले, होम पिच वाल्यानंतर काही अनुभव नसल्यासारखंच त्यामुळे अमित शहाही गोंधळले असतांना त्यांनी मोदींना बोलावून घेतलंय, नॅशनल टीमचे कॅप्टन जे जवळ-जवळ सर्वच सामने जिंकतात, धोनीप्रमाणे.

धोनीप्रमाणे यासाठी की धोनी आणि त्यांची स्थिती फार वेगळी नाही, धोनी नॅशनल टीममध्ये हिरो ठरतो, मात्र आयपीएलच्या सामन्यात त्याची काय वाट लागते हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो आयपीएल टीम लीड करतो, तेव्हा त्याला मुंबई इंडियन्सचे समर्थक नाकं मुरडतात, टीका करतात, धोनी अडचणीत आला तर एकच कल्लोळ होतो, तसंच मोदींचं झालंय, धोनी नॅशनल टीमसाठी खेळतो, तेव्हा हेच समर्थक त्याची वाहवा करतात, मात्र आयपीएलमध्ये धोनीची धमछाक होते, आता हे असंचं चाललंय, असं आहे आपलं आयपीएल, आणि इंडियन पॉलिटीक्स लीग..

चला तर मग उद्या पुन्हा भेटू, 
आपला बंडोजीराव...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.