काँग्रेसच्या जाहिरातीत ‘शिव’ला शोधणाऱ्यानं ‘शिवसेने’ला शोधलं

सध्या टिव्हीवर सर्वच पक्षांच्या निवडणूक जाहिरातींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातील काँग्रेसची एक नवीन जाहिरात आहे. त्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी ‘शिव’ नावाच्या मेकॅनिकला शोधत असतो. पण तोच अनिकेत विश्वासराव शिवसेनेचा प्रचार करतोय. म्हणजे खरोखरच त्यानं ‘शिव’सेनेला शोधलं म्हणायचं.

Updated: Oct 8, 2014, 03:00 PM IST
काँग्रेसच्या जाहिरातीत ‘शिव’ला शोधणाऱ्यानं ‘शिवसेने’ला शोधलं title=

मुंबई: सध्या टिव्हीवर सर्वच पक्षांच्या निवडणूक जाहिरातींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातील काँग्रेसची एक नवीन जाहिरात आहे. त्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी ‘शिव’ नावाच्या मेकॅनिकला शोधत असतो. पण तोच अनिकेत विश्वासराव शिवसेनेचा प्रचार करतोय. म्हणजे खरोखरच त्यानं ‘शिव’सेनेला शोधलं म्हणायचं.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारासाठी अनिकेत विश्वासराव आला होता. त्याच्यासोबत अभिनेता संतोष जुवेकर हा सुद्धा उपस्थित होता. एकूणच विधानसभेच्या रणधुमाळीत अभिनेत्यांची चांगलीच चांदी असल्याचं पाहायला मिळतेय.

सध्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. ‘माझी नस जो ओळखतो, त्याच्याच हातात मी माझ्या गाडीची चावी देणार, असा विश्वास फक्त काँग्रेसवर, असं म्हणणारा अनिकेत विश्वासराव शिवसेनेच्या प्रचारात पाहून आश्चर्य वाटायला नको... अहो हेच तर दिवस आहे त्यांच्याही कमाईचे... म्हणून जाहिरातींना भुलू नका... आपल्या मतदानाचा योग्य तो वापर करा, असंच सर्व मतदारांना म्हणावं लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.