shiv sena

मुंबई महापौर निवडीबाबत मनसेनेने केली भूमिका जाहीर

महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ही आता मनसेची असणार आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आता मनसेनेने आपले मौन सोडले आहे. त्यामुळे आता अधिकच रंगत आलेय. 

Mar 3, 2017, 08:16 PM IST

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा

काँग्रेसने यासाठी समाजावादी पार्टी आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मागितला आहे.  

Mar 2, 2017, 09:12 PM IST

मुंबईचे महापौरपद काटेरी मुकूट..

मुंबई महापालिकेचा महापौर बनवणं शिवसेनेसाठी फार अवघड बाब नसली तरी मॅजिक फिगर पाठिशी नसल्यानं पाच वर्षे महापालिकेचा कारभार हाकणंही सेनेला खूप अवघड जाणाराय. शिवसेनेला न मागताही काँग्रेस, राष्ट्रवादीची अप्रत्यक्ष मदत होईल, पण स्थायी समितीसह विविध समित्यांमध्ये इतर पक्षांच्या नाकदु-या काढण्याची वेळ शिवसेनेवर येणाराय. भाजपनंही काही जुगाड करून महापौर केल्यास त्यांनाही याच स्थितीला सामोरं जावं लागणाराय.

Mar 2, 2017, 08:48 PM IST

राष्ट्रवादीची वेट अँड वॉचची भूमिका...

 मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर होईल हा सध्याच्या स्थितीतील सर्वात मोठा राजकीय वर्तुळात चर्चिला जाणारा विषय आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पुढील तीन चार दिवस आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

Mar 2, 2017, 08:38 PM IST

गीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.

Mar 2, 2017, 04:44 PM IST

भाजपला पाच काय २५ वर्ष धोका नाही - महादेव जानकर

राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतील वाद मिटविण्यासाठी आपण पडद्यामागून भूमिका वठवित असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं. 

Mar 1, 2017, 08:24 PM IST

बुलेट ट्रेन उपसमिती : शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

बुलेट ट्रेनबाबातच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये शिवसेनेचा एकच मंत्री असणार आहे. मुख्यमंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये सेनेचा अडथळा येणार नाही, याची मुख्यमंत्री यांनी काळजी घेतली आहे.

Mar 1, 2017, 12:03 AM IST

मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्यासाठी भाजपचे पीच तयार

महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मुंबईत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना नेत्यांशी गुप्त चर्चा, झाल्याचे वृत्त आहे. झी 24 तासला सूत्रांची ही माहिती मिळाली. त्यामुळे मुंबईतल्या सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.

Feb 28, 2017, 11:11 PM IST

शिवसेनेच्या अजेंड्यातील कोस्टल रोडला महिन्यात परवानगी

मरिन ड्राइव्ह ते कांदिवलीपर्यंत असलेल्या प्रस्तावित कोस्टल रोडला एका महिन्यात पर्यावरण खात्याची परवानगी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेतली.

Feb 28, 2017, 08:47 PM IST

सरकार पाडायची काँग्रेस, राष्ट्रवादीची नाही ताकद - चंद्रकांत पाटील

 राज्यातील सरकार विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस अविश्वास ठराव आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, तसेच दोन्ही काँग्रेसच्या या खेळीला शिवसेना साथ देणार नाही असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

Feb 28, 2017, 07:35 PM IST

मुंबईत शिवसेनेशी पॅचअपचे भाजपाचे प्रयत्न सुरू

 मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84 आणि भाजपाच्या 82 जागा निवडून आल्याने मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. अपक्ष आणि इतर नगरसेवकांना आपल्याबरोबर घेण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केला असला तरी आता मुंबईत शिवसेनेबरोबर पॅचअप करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Feb 28, 2017, 06:09 PM IST

मुंबईत युतीबाबात शिवसेनेकडून प्रस्ताव नाही : भाजप

महापालिका निवडणुकीत शिवसेने जरी मोठा पक्ष असला तरी बहुमताचा आकडा ते गाठू शकलेले नाहीत. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली तर ते शक्य आहे. मात्र, युती होणार नाही, अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी युती करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे भाजपने म्हटलेय.

Feb 28, 2017, 04:36 PM IST

मुंबई महापालिकेतील शिवसेनेची संख्या वाढली...

 मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी शिवसेनेची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८४ शिवसेना आणि ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर ८८ संख्या असलेल्या शिवसेनेच्या गोटात पाचवा अपक्ष आला आहे. 

Feb 28, 2017, 04:29 PM IST

मनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार पराभूत

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात १२ ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

Feb 27, 2017, 11:05 PM IST

काँग्रेसने ओढली शिवसेनेची री....

 उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले तसाच निर्णय महाराष्ट्रात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी शिवसेनेने मागणी केल्यानंतर आता त्यांची री काँग्रेसने ओढली आहे. 

Feb 27, 2017, 10:35 PM IST