'शोले' चित्रपटात भूमिका, बॉलिवूडमध्ये 50 हून अधिक वर्षे करतोय काम; कोण आहे 'हा' चिरतरुण कलाकार?

या फोटोमधील मुलगा हा आज सिनेसृष्टीतील मोठा कलाकार आहे. 'शोले' सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातून झळकणारा कोण आहे हा मराठीसोबत बॉलिवूड सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता?

Updated: Jan 19, 2025, 03:00 PM IST
'शोले' चित्रपटात भूमिका, बॉलिवूडमध्ये 50 हून अधिक वर्षे करतोय काम; कोण आहे 'हा' चिरतरुण कलाकार? title=

Guess the Actor: वरील फोटोमधील मुलगा कोण आहे? हे अनेकांना ओळखता येत नसेल. चेहऱ्यावर स्मित हास्य असणारा हा मुलगा आज सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक आहे. या अभिनेत्याने अगदी लहानपाणापासूनच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत मनोरंजन विश्वात त्याने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटांसोबत, बॉलिवूड चित्रपटांमधूनदेखील त्याने आपली ओळख निर्माण केली. टी.व्ही आणि ओटीटी  प्लॅटफॉर्मवरील बऱ्याच भाषांमधील चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले' मध्येदेखील हा अभिनेता झळकला होता. 

कोण आहे 'हा' अभिनेता?

खरंतर, या फोटोमधील व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसुन मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर आहेत. सचिन पिळगावकरांनी 'शोले' या चित्रपटात अहमदची भूमिका साकारली होती. लहानपणापासूनच सचिन यांनी बालकलाकार म्हणून काम करत आपल्या करिअरची सुरुवात केली. 'नवरी मिळे नवऱ्याला', 'अशी ही बनवाबनवी', 'आमच्यासारखे आम्हीच' आणि 'नवरा माझा नवसाचा' अशा मराठीतील चित्रपटांचे ते निर्माते राहिले आहेत.  तसेच, त्यांनी 'गीत गाता चल', 'शोले', 'बालिका वधू' आणि 'नदीयों के पार' अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सचिन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्यासोबत 1980 आणि 1990 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या चाहत्यांचे मन जिंकले.

 

टी.व्ही शो मध्ये सुद्धा केले काम

सचिन पिळगावकर यांनी सिनेसृष्टीत आपली छाप सोडण्याव्यतिरिक्त त्यांच्या अनेक टी.व्ही शो हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. टी. व्ही शो मध्ये डेब्यू करण्यासोबतच त्यांनी 'तू तू मै मै' या हिंदी कॉमेडी सिरियलचे दिग्दर्शन केले आहे.  2007 मध्ये सचिन यांनी कन्नड सिनेसृष्टीत 'एकदंथा' या चित्रपटातून पदार्पण केले. 

हे ही वाचा: कधीकाळी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा आज आहे 200 कोटींचा मालक; कोण आहे 'हा' सुपरस्टार?

सचिन हे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. तसेच, या दोघांना श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबाचीसुद्धा चाहत्यांमध्ये बरीच चर्चा असते.