विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयामागे संघाचा वाटा? जाणकारांचं मत काय?

विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 19, 2025, 07:44 PM IST
विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयामागे संघाचा वाटा? जाणकारांचं मत काय? title=

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर सतर्क झालेल्या भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व विजय खेचून आणला. या घवघवीत यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हिस्सा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची दोन दिवसीय बैठक झाली. त्यावरचा आमचा हा खास रिपोर्ट. 

विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली. या विधानसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र मेहनत केल्यानं हे यश मिळवता आल्याचं बोललं जात आहे. राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती. यात संघानं भाजपाच्या मंत्र्यांचं बौद्धिक घेतलं. लोकसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला मोठा पराभव स्विकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपानं अभूतपूर्व विजय खेचून आणला. यामध्ये संघाचं मोठं योगदान असल्याचं जाणकार सांगत आहेत. मुंबईतल्या दोन दिवसांच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मंत्र्यांचं विविध विषयांवर चर्चा झाली.

संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना

आपल्या विचारांना प्राधान्य द्या, गतिमान कारभार करा असा सल्ला संघाकडून भाजप मंत्र्यांना देण्यात आलाय. मुंबईत झालेल्या संघ आणि भाजपच्या समन्वय बैठकीत या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच शासनाच्या योजना संघटनामार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्याचं समजतंय. बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, आकाश फुंडकर, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, पंकज भोयर उपस्थित होते. 

बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा 

या बैठकीत संघाच्या इतर आयमांनी निवडणूक काळात केलेल्या कामांचा संघटना वाढीसाठी काय उपयोग झाला? यांचंही विश्लेषण या बैठकीत केलं गेलं. शेती, आरोग्य, शिक्षण, कामगार, उद्योग तसेच महिला, बाल अत्याचारांसह इतर विषयांवर देखील या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. येत्या काळात भाजपाला याचा कसा फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.