अंडरग्राऊंड रस्त्यावर 'किस' करणाऱ्यांवर होणार पोलिसांकडून कारवाई

अंडरग्राउंड रस्त्यावर तरुण जोडप्याचा 'किस'चा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून पोलिसांनी आता प्रवाशांना चेतावनी दिलीय. जर आता कुणी अंडरग्राऊंड रस्त्यावर किस करतांना आढळलं तर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

PTI | Updated: Jul 21, 2015, 06:39 PM IST
अंडरग्राऊंड रस्त्यावर 'किस' करणाऱ्यांवर होणार पोलिसांकडून कारवाई title=

बीजिंग: अंडरग्राउंड रस्त्यावर तरुण जोडप्याचा 'किस'चा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून पोलिसांनी आता प्रवाशांना चेतावनी दिलीय. जर आता कुणी अंडरग्राऊंड रस्त्यावर किस करतांना आढळलं तर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

काय आहे घटना?

नुकताच चीनच्या उत्तर पूर्व लिओनिंग परिसराच्या शेनयांगमध्ये अंडरग्राउंड रस्त्यावरील ट्रेनमध्ये एक जोडपं चुंबन घेतांना त्यांचे अंतरंग व्हिडिओ वायरल झाला होता. ज्यावर सोशल मीडिया युजर्सनी चांगल्याच तिखट प्रतिक्रिया दिल्या.

व्हिडिओ आणि फोटो टाकणाऱ्या व्यक्तीनं लिहिलं, 'आपण सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळू शकत नाही का? आपल्या आजूबाजूला लहान मुलं असतात?' यानंतर शेनयांग पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

अशा घटना चीनमध्येच नाही तर भारतातही सर्रास होतांना दिसतात. आपल्या वागण्यानं परिसरातील इतर व्यक्तींवर परिणाम होतो. तेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरतांना भान ठेवावं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.