नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, कलाम यांच्या निधनानंतर आज कोणतीही सुटी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.
शिलाँगहून डॉ. कलाम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने गुवाहाटीत आणण्यात आले. त्यानंतर अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पार्थिव गुवाहाटीहून दिल्लीला रवाना झाले आहे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण केली, कलाम हे आमच्यासाठी मार्गदर्शक होते, असे उद्गार नरेंद्र मोदी यांनी काढलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.