10

हेमा मालिनीच्या ड्रायव्हरला अपघातप्रकरणी अटक

आग्रा-जयपूर मार्गावर भाजप खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ड्रायव्हरला अपघाताप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हेमा मालिनीच्या कारने एका लहान मुलीचा बळी घेतला.

प्रियांका गांधी यांच्यासाठी भाजप सरकारचा नियमांना फाटा

काँग्रेसमधलं वजनदार व्यक्तीमत्व म्हणजे प्रियांका गांधी यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या काँग्रेस सरकारनेच नव्हे, तर भाजप सरकारनंही नियमांना फाटा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

हॉकी : मलेशियाला धूळ चारत भारत उपांत्य फेरीत

जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाला धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली.

ज्वाला गुट्टा प्रचंड संतापली, बॅडमिंटन असोसिएशनवर आगपाखड

महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी यांचा ऑलिम्पिक तयारी टीममध्ये समावेश करण्यात न आल्यानं ज्वाला गुट्टा प्रचंड संतापलीय. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियावर तिनं जोरदार आगपाखड केलीय. आमचे हैदराबादचे प्रतिनिधी प्रसाद भोसेकर यांना दिलेल्या मुलाखतीत ज्वालानं काय भडीमार केलाय. 

नरेंद्र मोदींची आता डिजिटल इंडिया मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया मोहिमेचा शुभारंभर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर कोणती योजना आणणार, यांसदर्भात देशवासियांमध्ये उत्स्कुता वाढलीय.

पेट्रोल - डिझेल स्वस्त

अलिकडेच दरात वाढ करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत.

मोदींनी नाकारली केजरीवाल यांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ही भेट नाकारण्यामागे व्यस्तता हे कारण देण्यात आले आहे.

बदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट

एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.

ललित मोदी यांच्या स्थलांतर अर्जावर वसुंधरा राजेंची सही, काँग्रेसकडून पुरावा

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. दरम्यान, भाजपने राजे यांची पाठराखण केली आहे. 

योगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

  हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.