10
10
भारतात योगावर अभ्यास करण्यासाठी आलेल्या एका अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ‘पिपली लाइव्ह’ या हिंदी चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारूखी यांच्यावर त्या अमेरिकन महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळं फारूखी यांना बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत.
वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन इथं जुलै २०१४ मध्ये ललित मोदींना भेटल्याची बाब उजेडात आल्यानं अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. अकरावीच्या विद्यार्थिनीला शेजारच्या बाईचं रागावणं इतकं मनाला लागलं की, तिनं त्या बाईच्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली. घटना 10 जूनची आहे. चिमुरडीला घरी टरबूज खायला बोलावून त्यानं तिची गळा दाबून हत्या केली.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील.
स्वस्त घरांसाठी ६.५ टक्के व्याज मिळणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता ‘हाऊसिंग फॉर ऑल’ मिशनला प्रारंभ झालाय. शहरांमधील गरीब, अल्प उत्पन्न गटातील जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. ते 84 वर्षाचे होते.
आमचे पाच वर्षांत कोणतेही संबंध नव्हेत, असे विधान करणारे आपचे आमदार सोमनाथ भारती अडचणीत आले आहेत. त्यांची पत्नी लिपिका यांनी म्हटलेय, संबंध नव्हते तर मुलं कशी झालीत?
योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.