मुंबई: एस. एस. राजमौली यांचा सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'नं आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. चित्रपटाचं पोस्टर ५० हजार स्क्वेअर फूट मोठं बनवलं होतं. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय.
रेफरेंस बुकनं आपल्या ऑफिशिअल वेबसाइटवर याबाबत लिहिलंय, सर्वाच मोठं पोस्टर साइज ४,७९३.६५ स्क्वेअर मीटर आहे. २७ जून २०१५ ला भारताच्या कोच्चीमध्ये 'ग्लोबल यूनायटेड मीडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड' नं मिळवलं होतं.
आपला आनंद साजरा करत राजमौली यांनी ट्विटरवर वेबसाइटची लिंक शेअर केलीय आणि लिहिलं आता हे ऑफिशिअली मिळालंय. 'ग्लोबल यूनायटेड मीडिया'मध्ये मिस्टर प्रेम मेनन आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन.
Now it is officially awarded.. Congratulations to Mr. Prem Menon and his team at global United media https://t.co/RvauQsazNx
— rajamouli ss (@ssrajamouli) July 22, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.