लुईस बर्जर लाचखोरी प्रकरण, प्रकल्प अधिकारी वाचासुंदरला अटक

सध्या देशभर गाजत असलेल्या लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर यांना अटक केलीय. 

PTI | Updated: Jul 28, 2015, 08:59 PM IST
लुईस बर्जर लाचखोरी प्रकरण, प्रकल्प अधिकारी वाचासुंदरला अटक  title=

पणजी, गोवा: सध्या देशभर गाजत असलेल्या लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर यांना अटक केलीय. 

प्रकल्पाच्या सुरवातीपासून वाचासुंदर प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपण या प्रकरणी निर्दोष असल्याच वाचासुंदर यांनी म्हटलंय. . 

गोव्यात पाणी पुरवठा आणि मल:निसारण प्रकल्पासाठी जायका म्हणजे जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी या कंपनीशी करार झाला होता. कंपनीनं गोव्यातील प्रकल्पाचं काम मिळविण्यासाठी सहा कोटींची लाच दिल्याचं अमेरिकेच्या न्यायालयात कबूल केलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

गोवा सरकारच्या सुचनेनुसार पोलिसांनी तत्कालीन मंत्री आणि लुईस बर्जर कंपनी विरोधात गुन्हा नोंद करून प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर यांना अटक केलीय. त्यामुळं या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. 

त्यांच्यावर आयपीसी 120 बी आणि भ्रष्टाचार विरोधी कलम 7,8,9 आणि 13 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय. या प्रकल्पात एक हजार एकतीस (1031 ) कोटींची गुंतवणूक केली असून त्यात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त होतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.