नवी दिल्ली : १९९३च्या मुंबई हल्ल्याचा दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे.
याकूबच्या अंत्ययात्रेत कुटुंबिय आणि मित्र परिवाराव्यतिरीक्त सहभागी झालेल्या लोकांवर गुप्तचर यंत्रणेने नजर ठेवावी. यातील काहीजण 'संभाव्य' दशतवादी असू शकतील. किंवा त्यातील काही जण भविष्यात दहशतवादाकडे ओढले जाऊ शकतात. त्यांच्यावर नजर ठेवणे हे दहशतवादाला रोखण्याचाच एक भाग आहे, असेही तथागत रॉय म्हणालेत.
दरम्यान, रॉय यांच्या ट्विटवर नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. काहींनी टीका केली आहे. रॉय जातीयवाद निर्माण करण्याचे काम करीत असल्याची टीका करण्यात आली.
टीका करण्यात आल्यानंतर रॉय यांनी पुन्हा ट्विट केले. मी माझ्या ट्विटमध्ये कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल बोललेलो नाही. त्यामुळे मी जातीयवादी आहे, असा आरोप कसा काय केला जाऊ शकतो, असा सवाल रॉय यांनी उपस्थित केला.
त्यांनी आपल्या ट्विटचे समर्थन केलेय. जनहिताशी संबंधित एखादी बाब नजरेस आणून देणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. आपण राज्यपालपदाच्या कोणत्याही मर्यादा ओलांडलेल्या नाहीत, असे म्हणाले.
Intelligence shd keep a tab on all (expt relatives & close friends) who assembled bfr Yakub Memon's corpse. Many are potential terrorists
— Tathagata Roy (@tathagata2) July 31, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.