गुरूदासपूर हल्ला: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दहशतवादी

पंजाबमध्ये गुरूदासपूरमध्ये कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अजून भीती संपलेली नाही. गुरूदासपूरमध्ये काल ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून आज 8 जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत. त्यातला एक बॉम्ब पंजाब पोलिसांच्या बॉम्बनाशक दलानं निकामी केलाय. 

PTI | Updated: Jul 28, 2015, 08:50 PM IST
गुरूदासपूर हल्ला: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दहशतवादी title=

गुरूदासपूर: पंजाबमध्ये गुरूदासपूरमध्ये कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अजून भीती संपलेली नाही. गुरूदासपूरमध्ये काल ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून आज 8 जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत. त्यातला एक बॉम्ब पंजाब पोलिसांच्या बॉम्बनाशक दलानं निकामी केलाय. 

तर दुसरीकडे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. यात एका दहशतवाद्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. जवळपास १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तीघं दिसतायेत, ज्यांनी आर्मी जवानांचा गणवेश घातलाय. त्यांच्या पाठीवर मोठ-मोठ्या बॅग आहेत. एके-४७ रायफल त्यांच्या हाती दिसतोय. या व्हिडिओमध्ये सोमवारी सकाळी ४.५५ मिनीटांनी ते रस्त्यावर दिसत आहेत.

गुरूदासपूरचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक (एसएसपी) जी एस तूर यांनी सांगितलं की, दीनानगर भागातील तारागढच्या एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे फोटो कैद झालेत. जेव्हा तिघं दहशतवादी पाकिस्तानजवळील सीमेपासून बसमधून शहरात दाखल झाले.

तूर यांनी सांगितलं की, तपासादरम्यान कळलं या दहशतवाद्यांनी एका मिनी टेंपोच्या ड्रायव्हरकडून त्याची गाडी घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एका चालत्या बसवर गोळीबार सुरू केलाय.

आपल्या मारूती कारनं भाजी आणायला जाणाऱ्या व्यक्तीची त्यांनी गाडी घेतली. कार मालक कमलजीत सिंह यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी त्याला गाडीबाहेर काढलं आणि रस्त्यावर फेकून दिलं. पंजाब पोलिसांनी आज दीनानगर पोलीस स्टेशन परिसरात जप्त केलेले दोन ग्रेनेड आज सकाळी निष्क्रिय केले. 

सोमवारी झालेल्या या हल्ल्यात एसपींसह सात जण शहीद झाले. तब्बल १२ तास दहशतवादी आणि पंजाब पोलीस, जवानांमध्ये गोळीबार सुरू होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.