श्रीलंका क्रिकेट दौऱ्यावर पत्नी, गर्लफ्रेंडला नेण्यास बंदी

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निर्बंध घातले आहेत. यामध्ये दौऱ्यावर जाताना पत्नी, गर्लफ्रेंडला  नेण्यास बंदीचा समावेश आहे.

PTI | Updated: Aug 1, 2015, 04:48 PM IST
श्रीलंका क्रिकेट दौऱ्यावर पत्नी, गर्लफ्रेंडला नेण्यास बंदी title=

मुंबई : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निर्बंध घातले आहेत. यामध्ये दौऱ्यावर जाताना पत्नी, गर्लफ्रेंडला  नेण्यास बंदीचा समावेश आहे.

टीम इंडिया या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या पूर्वीच्या धोरणानुसार यंदाही भारतीय क्रिकेटपटूंना पत्नी आणि मैत्रीणींना नेण्यास मज्जाव करण्यात आलाय.

श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना पुरेशी विश्रांती मिळाली असून, त्यांनी कुटुंबीयांसोबत वेळ घालविलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दौऱ्यावर नेण्यास मनाई करण्यात आली आहे, असे  बीसीसीआयने म्हटलेय.

टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली परदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.