रात्री 11.30 वाजता अपडेट
- ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण सरन्यायाधीशांच्या घरी दाखल, सुप्रीम कोर्टाचे रजिस्टारही उपस्थित
- याकूबच्या फाशीला 14 दिवसांची स्थगिती द्या, याकूबच्या वकिलाची मागणी
- याकूब मेमनचे वकील पुन्हा सुप्रीम कोर्टात, राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका
फाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना
नागपूर: 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी दहशतवादी याकूब मेमन फाशीच्या शिक्षेनं चांगलाच घाबरलेला दिसतोय. याकूबनं आज जेवण केलं नसल्याचं कळतंय. सुरक्षेच्या दृष्टीनं याकूबजवळील पेन-पेन्सिल आणि इतर वस्तू तुरुंग प्रशासनानं परत घेतल्या आहेत. दरम्यान, याकूबनं मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केलीय.
नागपूर पोलिसांची ड्यूटीची वेळ वाढविली
याकूबला उद्या फाशी दिली जाणार असल्यामुळं नागपूरमधल्या पोलिसांवर कामाचा ताण वाढलाय. नागपूर जेल आणि शहरातल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कामाची वेळ वाढवण्यात आली आहे. 12 तासांऐवजी सर्वांची ड्युटी 24 तासांची करण्यात आली आहे. जेल परिसर आणि शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहराला छावणीचं रूप आलंय.
कुटुंबियांना याकूबचा मृतदेह सोपवणार?
नागपूरमध्ये उद्या सकाळी सात वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात येणार आहे. यावेळी याकूबच्या कुटुंबातील दोन जण उपस्थित राहू शकतात. त्यानंतर याकूबच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची मागणी केली तर अटींच्या अधीन राहून मृतदेह ताब्यात देण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल. मात्र अंतिम निर्णय तुरुंग अधिकाऱ्यांचाच राहील असं स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे देण्यात आलंय.
नागपूर तुरूंग परिसरात कलम 144 लागू
याकूब मेमनचं काऊंटडाऊन सुरू झालंय. त्याच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास उरलेत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट कटाचा सूत्रधार असलेल्या याकूबला तब्बल 22 वर्षानंतर उद्या सकाळी 7 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. त्याला फाशी देण्याची सर्व तयारी नागपूर सेंट्रल जेलमध्ये झालीय. नागपूर सेंट्रल जेल परिसरात कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आलीय. जेलबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नेमका उद्याच याकूबचा 53 वा वाढदिवस आहे आणि वाढदिवशीच त्याला मृत्यूदंड देण्याचं फर्मान विशेष टाडा कोर्टानं जारी केलंय.
Update - 5.43 pm -
राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला. त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.
Update - 5.03 pm -
राष्ट्रपतींनी याकूबच्या दया अर्जावर मागितला गृहमंत्रालयाकडे सल्ला
या संदर्भात नवीन आधार निर्माण होतो का, असा राष्ट्रपतींनी मागितला सल्ला
गृहमंत्रालय देणार लवकर उत्तर देणार राष्ट्रपतींना
Update - 4.54 pm -
नागपूरमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली
मुंबई बॉम्ब स्फोटात बळी गेेलेल्यांना न्याय मिळाला - संजय राऊत
Update - 4.36 pm -
- याकूबचा भाऊ सुलेमान मेमन नागपूर कारागृहात दाखल
Update - 4.40 pm -
- गुरुवारी नागपूर तुरुंगात सकाळी ७ वाजता याकूबला चढवलं जाणार फासावर
- माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास... - सुलेमान मेमन, याकूबचा भाऊ
- याकूबचं टाडा कोर्टाचं डेथ वॉरंट योग्यच - सुप्रीम कोर्ट
- याकूब मेमनला उद्याच होणार फाशी
Update - 4.00 pm -
- राष्ट्रपती आजच याचिकेबाबत निर्णय घेऊ शकतात - सरकारी वकिल उज्ज्वल निकम
- पोलीस महासंचालक संजीव दयाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. नागपूर जेलमध्ये फाशीची तयारी पूर्ण
Update - 3.57 pm - महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींच्या निर्णयाकडे लक्ष
- राज्यपाल विद्यासागर राव यांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली.
- याकूबची फाशी कायम, क्युरिटीव पेटीशनवर दुस-यांदा सुनावणी होणार नाही
- सुप्रीम कोर्टानं याकूब मेमनची याचिका फेटाळली, पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी नाही
- याकूब मेमन प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
- याकूब मेमन प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पाळली गेली, असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत
- याकूब मेमनच्या याचिकेसंदर्भात याकूबच्या वकिलांचा तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपला. कुठल्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ आपला निर्णय जाहीर करणार आहे.
- मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमन याने केला राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज
- याकूब मेमनची पुन्हा एकदा नव्याने दया याचिका, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे केली याचिका.
- याकुबला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यासंदर्भात त्याची एक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.
- याकूब मेमनच्या शिक्षेवरून विधानसभेत गदारोळ, फाशीला विरोध करणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी शिवसेनेची मागणी
- डेथ वॉरंट अवैध असल्याने रद्द करण्यात यावा, याकूब मेमनच्या वकिलांची मागणी
- याकूब मेमनच्या याचिकेवरील सुनावणीस सुरूवात
- त्रिसदस्यीय खंडपीठासमोक याकूब मेमनच्या याचिकेवरील सुनावणी
- १९९३च्या मुंबई स्फोटाचा गुन्हेगार याकूब मेमनच्या फाशीच्या अंमलबजावणीसाठी आता २४ तासांहून कमी वेळ उरलाय. आणि सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठ फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर आज निर्णय घेणार आहे.
- दरम्यान नागपुरात याकूबच्या फाशीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्यात आता नागपूर तुरुंग आणि परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आलीय. शीघ्र कृतीदलाचे जवान तुरुंगपरिसरात तैनात करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : फाशीला स्थगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर पुन्हा एकदा नव्यानं तीन न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणीकरता सरकारतर्फे अटर्नी जनरल मुकूल रोहतगी कोर्टात हजर आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झाले.
दवे यांनी याकूबची याचिका फेटाळली तर कुरियन यांनी याकूबच्या क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात घातलेल्या घोळावर आधी निर्णय़ घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळं आता ही याचिका न्या. दीपक मिश्रा, न्या. प्रफुल्लचंद्र पंत आणि न्या. अमितवा रॉय यांच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढं सोपवण्यात आलीय. याकूबला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय यापूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यानुसार याकूबच्या फाशीची नागपूर जेलमध्ये तयारी सुरू आहे. मात्र आजच्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर फाशीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.