नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनावर दहशतवादाचं काळं सावट पसरलंय. दहशतवादी देशात हवाई हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा अलर्ट जारी केलाय.
तसंच दहशतवादी दिल्ली-लाहोर विमानाचं अपहरण करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलीय.. यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं एक योजना आखल्याची माहिती मिळतेय. यासाठी दहशतवादी पॅराग्लायडर्सचाही वापर करणार असल्याचं बोललं जातंय.
तसंच दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसण्याची शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेसह देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. विशेष म्हणजे लाल किल्ला आणि दिल्लीत सुरक्षाकवच बसवण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.