नरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस

आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्यावर संसदेत घमासान सुरु असताना  आज 'मोदीगेट' प्रकणावरुन संसदेत गरमागम चर्चा सुरु झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त करुन रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खर्गे यांनी केली.

PTI | Updated: Aug 12, 2015, 03:41 PM IST
नरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस title=

नवी दिल्ली : आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्यावर संसदेत घमासान सुरु असताना  आज 'मोदीगेट' प्रकणावरुन संसदेत गरमागम चर्चा सुरु झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त करुन रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खर्गे यांनी केली.

ललित मोदी, व्यापमं घोटाळ्याबाबत लोकसभेतील गोंधळाला सरकारच जबाबदार. सरकार याआधीच चर्चेला तयार झाले असते तर संसदेचे इतके दिवस वाया गेले नसते. आम्ही लोकसभेत गोंधळ घालण्याच्या विरोधात आहोत. या प्रकरणात चूक झालेली असल्यानेच पंतप्रधान या मुद्यावर मौन बाळगून आहेत. या चर्चेला आणि आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी खर्गेनी केली.

ते(ललित मोदी) आलिशान रिसॉर्टमध्ये, युरोपीय देशांमध्ये सुट्टी घालवत होते, त्यांना तुम्ही माणूसकीच्या दृष्टिकोनातून मदत कशी केली ? असा थेट सवाल मोदी सरकार आणि सुषमा स्वराज यांना त्यांनी केला. सुषमा यांनी आयपीएल घोटाळ्यातील व्यक्तीची मदत केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून सुषमा यांनी राजीनामा द्यावा, असे खर्गे म्हणालेत. ते पुढे म्हणालेत, जर सुषमा स्वराज यांना मोदींना मदत करायची होती तर त्यांनी मोदींना भारतात बोलवायला हवे होते. उच्चायुक्त, सेक्रेटरी कोणालाही न कळवता सुषमा यांनी मोदींना मदत केली. कायद्याचे उल्लंघन करत मदत करणे हा मोठा गुन्हा.

ललित मोदी यांना पोर्तुगालला जाण्यासाठी मंजुरी दिल्यास त्याचा भारत आणि इंग्लंडमधील द्विपक्षीय संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे विधान म्हणजे शिफारस नाहीतर काय आहे, असा प्रश्नही मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांना सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.