नवी दिल्ली : सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.
वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी गेल्या ६० दिवसांपासून हे माजी सैनिक जंतरमंतरवर आंदोलन करत होते. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्या माजी सैनिकांना पोलिसांनी जंतरमंतरवरुन हटवलं. इतकंच नाही तर या माजी सैनिकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्नही झाला.
तसंच या आंदोलनकर्त्यांनी लावलेले तंबूही पोलिसांनी उखडून टाकले. पोलिसांच्या या वागणुकीमुळे या माजी सैनिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.