आता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास

विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती. 

PTI | Updated: Aug 12, 2015, 11:45 AM IST
आता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास title=

नवी दिल्ली: विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती. 

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीनं आज हे जाहीर केलंय. १२ ऑगस्ट ते ७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा घेता येईल.

एअर इंडियानं आज सांगितलं की, घरगुती मार्गांवर इकॉनॉमी क्लासपासून प्रवास करणारे प्रवासी आपल्यासोबत २५ किलो सामान घेऊन जाता येईल. सध्या एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासचे प्रवासी आपल्यासोबत २० किलोपर्यंत सामान मोफत नेता येईल.

ज्या लोकांनी तिकीट १२ ऑगस्ट पहिले बुक केलंय, ते सुद्धा या सेवेचा फायदा घेऊ शकतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.