देशात कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत विशेष खबरदारी

देशात कोणताी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई मार्गाने देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

PTI | Updated: Aug 15, 2015, 06:59 AM IST
देशात कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत विशेष खबरदारी title=

नवी दिल्ली : देशात कोणताी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई मार्गाने देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

पंजाबमधील गुरुदासपूर आणि काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर ६९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा झेंडा फडकावणार असल्याने दिल्लीत जमिनीवरुन हवेत मारा करणारी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेय.

दिल्लीत ४० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेत. यापैकी निमलष्करी दले आणि दिल्ली पोलीस यांचे मिळून १२ हजाराहून अधिक जवान उच्च सुरक्षेच्या क्षेत्रात, विशेषत: पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार असलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याभोवती सज्ज राहणार आहेत. 

लाल किल्ला आणि परिसरात 'नो फ्लाय झोन' म्हणून घोषित करण्यात आलेय. पंतप्रधान व इतर मान्यवर ज्या मार्गावरून लाल किल्ल्यावर जाणार आहेत, त्यावर मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली गेली आहे.  दरम्यान,  जम्मू व काश्मीरमध्ये, तसेच नेपाळ आणि बांग्लादेशलगतच्या सीमांवरील सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्यात आली असून, कडक गस्त ठेवण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये, विशेषत: खबरदारी घेण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.