अमेरिकन ओपन : सानिया-हिंगीसचा अंतिम फेरीत

भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दुकलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

PTI | Updated: Sep 10, 2015, 02:00 PM IST
अमेरिकन ओपन : सानिया-हिंगीसचा अंतिम फेरीत  title=
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस - छाया : © AP

न्यूयॉर्क : भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दुकलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत सानिया-मार्टिना जोडीने अकराव्या मानांकित इटलीच्या सारा एर्रानी-फ्लाव्हिया पेन्नेट्टा यांचा ६-४, ६-१ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. अंतिम फेरीत सानिया-मार्टिनाचा सामना कॅसी डेलेक्वा आणि यारोस्लावा श्वेदोवा आणि अॅना ग्रोनेफिल्ड व कोको वांडेवेगे यांच्यातील विजेती जोडीशी होणार आहे.

या विजयामुळे सानिया-मार्टिना आणखी एक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्यापासून एक पाऊल दूर आहेत. यावर्षी सानिया-मार्टिना जोडीने विंबल्डनचे विजेतेपद पटकावले होते.

सानिया-मार्टिना जोडीने उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित हाओ-चींग चॅन आणि युंग-जॅन चॅन या तैवानच्या जोडीचा ७-६ (७-५), ६-१ अशा सेटने पराभव केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.