नवी दिल्ली : भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करणारा राजकीय पहिला पक्ष ठरलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जेडी नड्डा यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर केली.
या यादीमध्ये ५० टक्के उमेदवार महिला आहेत. तसेच यात युवकांना स्थान देण्यात आले आहे. ६० टक्के उमेदवारह अनुसूचित जाती जमातीचे आहेत. यात ५ उमेदवार हे यादव जातीचे आहेत. हे अती मागास वर्गातील आहेत. यादव समाजाचे हे लालू प्रसाद यादव यांना समर्थन लाभले आहे. त्यामुळे भाजपने या समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी त्या वर्गातील तरुणांना उमेदावारी बहाल केली आहे.
भाजपच्या यादीमध्ये २६ विद्यामान आमदारांना तिकीट दिलेय तर ३ विद्यामान आमदारांचे तिकीट कापले आहे. दरम्यान, नड्डाने सांगितले, आम्ही सर्व समाजाला स्थान दिलेय. तसा आम्ही प्रयत्न केलाय, असे ते म्हणालेत.
२४३ सदस्य असणारी बिहार विधानसभेची निवडणूक १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.