मध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ३० ठार, ८० जखमी

मध्य प्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील पटेलावदमध्ये आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण ठार झाले असून ८० लोक जखमी झालेत. जखमींना इंदोर आणि रतलाम रेफर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

PTI | Updated: Sep 12, 2015, 11:15 AM IST
मध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ३० ठार, ८० जखमी title=

झाबुआ : मध्य प्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील पटेलावदमध्ये आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण ठार झाले असून ८० लोक जखमी झालेत. जखमींना इंदोर आणि रतलाम रेफर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

हॉटेल नविन बस स्टॅंडच्या जवळ आहे. हॉटेलमध्ये सिलिंडर स्फोट झाला. यावेळी इमारतीचे छत कोसळले. या अपघातात ३० जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान चौकशीचे आदेश दिल्यामुळे ही घटना कशी घडली याची माहिती मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.