अभविपने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ निवडणूक जिंकली

 भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठापाठोपाठ आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली विद्यार्थी निवडणूक जिंकली. तब्बल १४ वर्षानंतर जेएनयूमध्ये अभाविपनं विजय मिळवलाय.

PTI | Updated: Sep 13, 2015, 03:39 PM IST
अभविपने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ निवडणूक जिंकली title=

नवी दिल्ली : भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठापाठोपाठ आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली विद्यार्थी निवडणूक जिंकली. तब्बल १४ वर्षानंतर जेएनयूमध्ये अभाविपनं विजय मिळवलाय.

अभाविपचा कार्यकर्ता सौरभ शर्मा यापुढे जॉईंट सेक्रेटरी असेल. तर  डाव्यापक्षाचा पाठिंबा असणाऱ्या ऑल इंडिया स्टुंडट्स असोशिएशनच्या उमेदवार उपाध्यक्षपदी निवडून आलाय. वसतिगृहांची सुरक्षा व्यवस्था हा या निवडणूकीचा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला.

२२ जणांच्या पॅनलसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. यावेळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी मतदान झालं. यानिमित्तानं डाव्यांचं वर्चस्व असणाऱ्या या विद्यापीठात भाजप प्रणित संघटनेनं मुसंडी मारल्यानं अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.