10
10
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.
माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
बलात्काराच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा निकाल आता २२ सप्टेंबरला लागणार आहे. दरम्यान, चालकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
देशाचे एअर फोर्सचे मार्शल अर्जन सिंग यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि चौकशी केली.
काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू इस्माइलला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. जवानांनी लश्कराच्या दोन अतिरेक्यांना ठार केलेय.
नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध लागू करण्याच्या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिलीय.
हरियाणातील बाबा रामरहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात झाडाझडतीत अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहे.
महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.
स्पेनच्या राफएल नदालनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. नदालने अर्जंटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3 आणि 6-2 अशा चार सेटमध्ये विजय मिळवलाय.