'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य

माधुरी दिक्षित ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार जरी असली तरी करिअरच्या सुरुवातीला ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये एक चांगले स्थान मिळवू शकली नव्हती. या अभिनेत्रीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे कोणीचं तिच्यासोबत काम करु इच्छीत नव्हतं. या अभिनेत्रीचे सलग 2 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे करिअर डळमळीत झाले.

Intern | Updated: Jan 6, 2025, 12:53 PM IST
'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य title=

माधुरी दिक्षितला बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणतात. माधुरी दिक्षित एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली तिच्या करिअरच्या प्रारंभिक काळात अनेक अडचणी होत्या. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर तिच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उठवले जात होते. सलग दोन चित्रपटांच्या फ्लॉप झाल्यानंतर तिचे करियर एकप्रकारे संकटात आले होते. पण एकाद्या मोठ्या टर्निंग पॉइंटमुळे तिला बॉलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्रीचा दर्जा मिळाला. 

माधुरीला 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात 'अपशकुनी मुलगी' म्हणून ओळखली जात होती. याच काळात तिने काही फ्लॉप चित्रपट दिले होते, ज्यामुळे तिच्या करिअरवर आक्षेप घेण्यात आले होते. पण 1988 मध्ये प्रदर्शित झालेला 'तेजाब' आणि त्यानंतर आलेला 'दिल' (1990), 'बेटा' (1992), 'हम आपके हैं कौन..!' (1994) आणि 'दिल तो पागल है' (1997) सारख्या चित्रपटांनी तिच्या करिअरला नवा रस्ता दिला. तिच्या अभिनयाची आवड, नृत्यकला आणि चार्मने तिला एक सुपरस्टार बनवले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या मते, सुरुवातीला माधुरीला कोणीही चित्रपटात घेत नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, तेव्हा माधुरीला 'मनहुस मुलगी' म्हणून ओळखले जात होते, कारण तिचे एका मागोमाग चित्रपट फ्लॉप होणारे होते. इंद्र कुमार यांनी माधुरीसोबत 'दिल' आणि 'बेटा' सारखे चित्रपट साइन केले, जे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. 

इंद्र कुमार पुढे सांगतात, 'माधुरीवर असा ठसा होता की ती 'फ्लॉप' आहे, पण 'तेजाब' आणि 'राम लखन' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी तिच्या 'फ्लॉप' टॅगला पूर्णपणे नष्ट केले. 'तेजाब' 1988 मध्ये आला आणि 'राम लखन' 1989 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर तिच्यावरचा टॅग आणि विरोध हा पूर्णपणे गायब झाला.'

हे ही वाचा: 'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण

माधुरीचे टॅलेंट, तिचे समर्पण आणि कठोर मेहनत हेच कारण होते की ती फ्लॉप चित्रपटांच्या संकटातून बाहेर पडून बॉलिवूडच्या शिखरावर पोहोचली. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही माधुरीने आपली विनम्रता आणि साधेपण कायम राखले. तिच्या कष्टांची आणि संघर्षाची ही कथा आजही अनेकांच्या प्रेरणास्थान आहे.