10

पासपोर्ट दुरुस्ती आता ऑनलाईन करता येणार

अनेकवेळा पासपोर्ट काढण्यासाठी कटकटी सहन कराव्या लागतात. मात्र, यात सुटसुटीतपणा येत आहे. तसेच पासपोर्ट काढला आणि त्यात काही त्रुटी राहील्या तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता यातून सुटका होणार आहे.  

'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती

 केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.

दिल्लीत पुन्हा 'आप'चा विजय, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

 बवाना पोटनिवडणुकीत चुरस पाहायला मिळाली.  ११ व्या फेरीत आप उमेदवाराने आघाडी घेत  भाजप आणि काँग्रसेला दे धक्का देत विजय मिळवला.

डोकलाम वाद : भारत-चीनकडून वादावर पडदा, सैन्य घेणार मागे

डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय.

डिजीटल पेमेंट करणाऱ्यांसाठी गुडन्यूज!

ऑनलाईन किंवा कार्डद्वारे व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार सध्या नव्या युक्त्या लढवत आहे.  २ हजार रुपयांच्या आतल्या बिलांची रक्कम डिजीटल पेमेंटच्या सुविधांचा वापर करून केल्यास करात दोन टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे. 

देशाचे नवे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांचा कार्यकाळ आज संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. ते उद्या आपला पदभार स्वीकारणार आहेत.

गोव्यात काँग्रेसचा पराभव, दोन्ही जागा भाजपकडे

गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत.  तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.

न्या. दीपक मिश्रा आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ

देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती दीपक मिश्रा पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. 

पंजाब, हरियाणासह पंचकुला परिसरात तणावपूर्ण शांतता

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर  सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे  समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, अण्णा द्रमुकचे १५ आमदार भाजपात दाखल

 तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक नेते आणि १५ आमदार शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेत.