10

प्रद्युम्न हत्या प्रकरण : आरोपी विद्यार्थ्याला ३ दिवसांची कोठडी

गुरुग्राम येथील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने १६ वर्षांपेक्षा मोठा आरोपी असल्याने त्याला ६ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती.

घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करी दलाला यश आले आहे. जम्मू-काश्मिरमधील बारमुल्ला जिल्ह्यात त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती लष्करी दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलीय.

महिला हॉकी आशिया चषक : भारतीय संघ अंतिम फेरीत, घेणार चीनचा बदला

महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जपानचा पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत चीनशी लढत होणार आहे.

भारत-अमेरिकासह ७ देशांत व्हॉट्सअॅप बंद

भारत आणि अमेरिकासह सात देशांत व्हॉट्सअॅप बंद झाल्याने याचा त्रास मोठ्याप्रमाणात व्हॉट्सअॅप यूजर्सना सहन करावा लागला. हे व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

चीनचा खोडा, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास नकाराधिकार

अमेरिकेच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारताला हवा असणारा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात लगाम बसलाय.

केजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.  

फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी, दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीवरुन वाद

  जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीवर फुटीरतावादी नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय. 

प्रफुल्ल पटेल यांना न्यायालयाचा झटका, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची पुन्हा निवडणूक

दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिलाय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केलेय.

दारुबंदी असताना विषारी दारुचे ५ बळी, ८ पोलीस निलंबित

बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.  

गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्वाचा निर्णय दिलाय. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालाय. गर्भपात करण्यासाठी आता पतीच्या परवानगीची गरज नसल्याचा निर्णय एका याचिकेवरील सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला.