10
10
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.
तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होण्यासाठी रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, घोषीत होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असून आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती बिघडली आहे. त्याचा मृत्यू झालेला नाही, असे स्पष्टकरण अब्दुलच्या कुटुंबीयांनी माध्यमासमोर दिलेय. त्यामुळे कालपासून जे वृत्त पसरले होते ती अफवा होती.
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिवाळीसाठी खास दिल्ली मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनवेळा विशेष राजधानी एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या १६ ऑक्टोबरपासून ही राजधानी धावणार आहे. तशी घोषणा आज रेल्वे मंत्रालयाने केली.
पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तीन आरोपींचे रेखाचित्चरजारी करण्यात आले आहे. एसआयटीकडून अडीचशे संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सैन्याला यश आले आहे. लितर गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून कारवाईला सुरुवात केली.
पुण्यातील गौतम बाम्बावले यांची भारताचे चीनमधील अम्बसिडर (दूतावास) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गौतम बाम्बावले हे १९८४ च्या फॉरेन सर्विस बॅचचे अधिकारी आहेत. १९८५ ते १९९१ दरम्यान ते बीजिंगमध्ये भारतीय दूतावासचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.