10
10
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी संघावर जोरदार टीका केली.
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत धुमश्चक्री सुरु आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दशहतवादी ठार करण्यात आलेत. तर तीन जवान जखमी झालेत.
भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात कोसळले. हे हेलिकॉप्टर आपल्या मोहीमेवर होते. हा अपघात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.
अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यावेळी रॉकेट हल्ला करण्यात आला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय. पहिल्याच दिवशी काल त्यांनी द्वारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला.
भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर खडेबोल सुनावले आहे. आम्ही वैज्ञानिक तयार केले. मात्र, पाकिस्तानने अतिरेकी आणि जिहाद्दी तयार करण्याचे काम केले, असे संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.
पंजाबमधील मोहालीत वरिष्ठ पत्रकार के.जे. सिंग आणि त्यांची ९२ वर्षीय आई गुरचरण कौर आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळलेत. त्यांची हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.