10

Good News,पीएफच्या बंद खात्यांवरही मिळणार व्याज

तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुमचे पीएफचे खाते बंद असेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. या बंद खात्यांवर व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चालू नसलेल्या खातेधारकांनाही आता व्याज मिळणार आहे.

नोकिया-६ काही सेकंदात आऊट ऑफ स्टॉक, आता ३० ऑगस्टला विक्री

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला तगडा नोकिया-६ भारतात लॉन्च केलाय. याची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरु झाली खरी मात्र काही सेकंदात हा फोन संपला. याची किंमत १४,९९९ रुपये आहे.

मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही : राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनं आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा राहुल गांधींनी आरोप केला. 

सरकारने ८१ लाख आधार कार्ड केली रद्द, यात तुमचे कार्ड नाही ना, असे करा चेक

देशात आतापर्यंत १११ कोटी लोकांनी आधार कार्ड काढले आहे. १० आकड्यांचा यूनिक आयडी नंबर आज जवळ जवळ सर्वच सरकारी योजनांसाठी महत्वाचा झालाय. तसेच आधार कार्ड सर्वानाच अनिवार्य करण्यात आलेय. मात्र, तुम्हाला माहित आहे का, गेल्या काही दिवसांत ८१ लाख आधार कार्ड रद्द करण्यात आलेत.

शिखर धवनचे शानदार शतक, लोकेश राहुल आऊट

भारत-श्रीलंका तिसऱ्या कसोटीत शिखर धवनने आपले ६ वे शतक ठोकले. शिखरने १०७ धावा करत हे शतक केले. टीम इंडिया १ बाद २०० धावा झाल्या आहेत.

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिला ठार

पाकिस्तानकडून सीमाभागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. पाक गोळीबारात एक ४५ वर्षीय महिला ठार झाली. मेंढर सेक्टर येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

भाजपविरोधात यूपीएची बैठक, राष्ट्रवादीची पाठ तर संयुक्त जनता दल सहभागी

भाजपविरोधी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली  १६ विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने  पाठ  फिरवली आहे. दरम्यान, यूपीएतून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाचे खासदार उपस्थित राहिले होते.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.

गुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.

अहमद पटेल यांना मतदान केलेले नाही, याचे दु:ख नाही : वाघेला

 काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मी काँग्रेसला मतदान केलेले नाही. कारण त्यांना ४० मतेही मिळणार नाही, पटेल यांचा पराभव अटळ आहे, असा गौप्यस्फोट शंकरसिंग वाघेला यांनी केलाय.