नवी दिल्ली : देशाचे एअर फोर्सचे मार्शल अर्जन सिंग यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि चौकशी केली.
अर्जन सिंग यांना दिल्लीतील आर अॅण्ड आर रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. सकाळी हृद्यविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
एअरफोर्स मार्शल अर्जन सिंग यांची भेट पंतप्रधान मोदी आणि संरक्षमंत्री निर्मला सीतारमण यांची घेतली आणि चौकशी केली. अर्जन सिंग हवाईदल सेनेचे असे एकमात्र अधिकारी आहेत त्यांना पाच स्टार रॅंक देण्यात आलेली आहे.
Delhi: PM Narendra Modi & Defence Minister visited Marshal of Indian Air Force Arjan Singh, who is critically ill, at Army Hospital R&R pic.twitter.com/zZUSqh8cBK
— ANI (@ANI) September 16, 2017