पंचकुला, हरियाणा : बलात्काराच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा निकाल आता २२ सप्टेंबरला लागणार आहे. दरम्यान, चालकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
आज निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालय परिसरात आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राम रहिमवर डेरा सच्चा सौदामधील व्यवस्थापक रंजीत सिंह आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्येचा आरोप आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची हत्या २००२ मध्ये झाली होती.
Now he agreed to appear before court. Filed application. Court will decide on Sept 22 if his statement will be taken: Navkiran Singh, lawyer pic.twitter.com/2bBHfBA8Rj
— ANI (@ANI) September 16, 2017
राम रहिमला २५ ऑगस्टला विशेष सीबीआय न्यायाधीश जगदीप सिंह यांनी बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर ते आज पुन्हा बाबा राम रहीमच्या विरोधातील हत्येच्या खटल्याचा निकाल होता. मात्र, हा निकाल पुढे ढकलण्यात आलाय. बाबा राम रहीमला सध्या रोहतक येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी २५ ऑगस्टला बाबा राम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी हिंसाचार घडवला होता. यात ३८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २५० हून अधिक जखमी झाले होते.